Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे: बुधवार पेठेत 'स्टिंग ऑपरेशन'च्या नावाखाली पत्रकाराचा प्रताप; विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे: बुधवार पेठेत 'स्टिंग ऑपरेशन'च्या नावाखाली पत्रकाराचा प्रताप; विनयभंगाचा गुन्हा दाखल


पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात एका लॉजमध्ये महिलेचे बेकायदेशीरपणे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली एका पत्रकाराने हे कृत्य केल्याचा आरोप असून, या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन कदम असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून पीडित महिलेने या संदर्भात रीतसर फिर्याद दिली आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी मध्यरात्री घडली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर कारवाईचे आदेश दिले आहेत.
तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, स्टिंग ऑपरेशनचे कारण पुढे करून संबंधित पत्रकाराने महिलेचे चित्रीकरण केले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पत्रकार संघाने या घटनेचा जाहीर निषेध केला असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या संदर्भात एक निवेदनही दिले आहे. बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये घडलेला हा विनयभंगाचा प्रकार अतिशय घृणास्पद असून, यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची समाजात बदनामी होत असल्याची भावना पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही लोकांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, पुणे श्रमिक पत्रकार संघाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अशा चुकीच्या कामात संघ कोणाचेही समर्थन करणार नाही. पत्रकार संघाने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन, आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी पत्रकार संघ नेहमीच तत्पर राहिला आहे. परंतु, अशा प्रवृत्तींमुळे संपूर्ण पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळे आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.