Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"पेट्रोलच्या दरात २५ रुपयांची वाढ होणार? सर्वसामान्यांची चिंता वाढली; खरोखरच खिशाला कात्री लागणार?"

​"पेट्रोलच्या दरात २५ रुपयांची वाढ होणार? सर्वसामान्यांची चिंता वाढली; खरोखरच खिशाला कात्री लागणार?"


कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज या ब्रोकर फर्मने विधानसभेच्या निवडणुका झाल्या की पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. तोपर्यंत पेट्रोल, डिझेलची किंमत वाढणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवायचा असेल तर तो 29 एप्रिल नंतरच वाढवला जाऊ शकतो. सध्या कच्च्या तेलाचा भाव 112 रुपये प्रति बॅरल आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाचा वाढता भाव लक्षात घेता पेट्रोलचा भाव 25 ते 28 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.


कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने भारताला या तेलाची आयात करताना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. आयात साधारण 13 ते 15 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तरीही या आयातीसाठीचा खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळेही हा खर्च भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्ष निवडणूक संपल्यानंतरच पेट्रोल प्रति लिटरमागे किती रुपयांनी वाढणार तसेच ही भाववाढ प्रत्यक्षात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.