Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, उपचार सुरु!

पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका, उपचार सुरु!

ही माहिती ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासना मार्फत दिली गेली आहे.

दरम्यान भाजपा आमदार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ब्रीच कॅंडी रुग्णलायत पोहोचले असून आशा भोसले यांच्या तबियत संदर्भात माहिती घेण्यासाठी शेलार रुग्णालयात गेले असल्याचे समजते आहे. ANI या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांच्या माहितीनुसार, ९२ वर्षीय आशा भोसले यांना शनिवार, ११ एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

सर्व प्रकारच्या गाण्यांमधून आवाजाची जादू

आशा भोसले यांनी गायीकीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविधांगी प्रकारच्या व विविध भाषांमधून त्‍यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या तोडांवर असतात. मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्‍यांनी गायन क्षेत्रात प्रवेश केला. भोसले यांची देदीप्यमान कारकीर्द त्यांच्या अविश्वसनीय बहुआयामी प्रतिभेमुळे ओळखली जाते, ज्यात भावपूर्ण गझलांपासून ते जोशपूर्ण कॅबरे गीतांपर्यंत विविध प्रकारांचा समावेश आहे. ओ.पी. नय्यर यांच्यासोबतच्या त्यांच्या भागीदारीतून 'आओ हुजूर तुमको' हे प्रसन्न गीत जन्माला आले आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे अजरामर गाणे, 'चुरा लिया है तुमने जो दिल को', आजही अविस्मरणीय आहे.

नातीने केले आवाहन

दरम्यान आशा भोसले यांची नात, जनाई भोसले हिने आपल्या आजीबरोबर इन्स्टावर फोटो शेअर करत भोसले यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच माझी आजी, आशा भोसले, यांना अतिशय थकवा आणि छातीचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; त्यामुळे कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी आम्ही विनंती करतो. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्व काही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे; तसेच या संदर्भात आम्ही तुम्हाला लवकरच माहिती देऊ असेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.