Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्री आक्रमक, आयुक्त निरुत्तर! बैठकीत रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा.

मंत्री आक्रमक, आयुक्त निरुत्तर! बैठकीत रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा.


भाईंदर :भाईंदरमधील भीषण आग दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांना घटनास्थळी अनुपस्थित राहिल्याबद्दल जाहीरपणे खडेबोल सुनावल्याची घटना शनिवारी घडली.

आयुक्तांनी फोनवर "देखता हूं"असे उत्तर दिल्यानंतर मंत्र्यांचा संताप अनावर झाला.

भाईंदरमधील मोकळ्या मैदानात उभारलेल्या झोपड्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली.या आगीत एकामागून एक सुमारे २० सिलेंडरचे स्फोट झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली.या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी अनधिकृत झोपड्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. मात्र, मंत्री घटनास्थळी पोहोचले असताना महापालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोरच आयुक्तांना दूरध्वनी केला.घटनास्थळी का उपस्थित राहिले नाही, असा प्रश्न मंत्र्यांनी विचारला असता आयुक्तांनी "देखता हूं"असे उत्तर दिले. यावर सरनाईक यांनी तत्काळ नाराजी व्यक्त करत, "अशी उत्तरे माझ्यासमोर देऊ नका,"अशा शब्दांत आयुक्तांना सुनावले. तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच जीवितहानी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.