Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- टेंभू कालव्याजवळ रक्ताचा सडा; ७६ वर्षीय वृद्धाचा डोक्यात वार करून निर्घृण खून

सांगली :- टेंभू कालव्याजवळ रक्ताचा सडा; ७६ वर्षीय वृद्धाचा डोक्यात वार करून निर्घृण खून


विटा : खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील एका ७६ वर्षीय वृद्धाचा कोळे (ता. सांगोला) डोक्यात वार करून खून केल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. बाबासाहेब भानुदास देशमुख असे या मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना काल (दि. २५) शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाणुरगड ते कोळे येथील टेंभू योजनेच्या कालव्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह सापडला. त्यानंतर तो मृतदेह बाणूरगड (ता. खानापूर) येथील बाबासाहेब देशमुख यांचा असल्याचे निष्पन्न झाले. खानापूर तालुक्यातील बाणुरगड येथील बाबासाहेब भानुदास देशमुख हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि. २४) सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाजारात गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. तिकडे त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता परंतु ते फोन घेत नव्हते. इकडे सुरुवातीला अनोळखी मृतदेह सापडला असे नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली परंतु त्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली. 

या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा सुरू केला. त्यात बाबासाहेब देशमुख यांच्या डोक्यात कशाने तरी वार केल्याचे आणि कान फाटून डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगोला मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार शिवपूजे व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. याबाबत सांगोला पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असून खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.