Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ; बहिणीच्या बँक खात्यातून ५० कोटींचे व्यवहार चव्हाट्यावर.

रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ; बहिणीच्या बँक खात्यातून ५० कोटींचे व्यवहार चव्हाट्यावर.


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड झाले आहे. नाशिकमधील पतसंस्थांमध्ये चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने खाते असल्याचे तपासातून उघड झाले आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवे खुसाले समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक राजकीय नेतेमंडळी, मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती. खरातने अनेकांचे आधार आणि पॅन कार्ड वापरून नाशिकमधील दोन पतसंस्थांमध्ये शेकडो बेनामी खाती उघडली, त्या खात्यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाने खाते

या प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे तपासात उघड झाले आहे. रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत अशोक खरातशी आपले कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा केला होता. तसेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पण ज्या पतसंस्थांमधून खरातने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, त्याच पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे बँकेचे खाते असल्याचे समोर आले आहे. संबंधित पतसंस्थेत प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने खाते असून त्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

घोटाळ्याची कार्यपद्धती 
एसआयटीने केलेल्या प्राथमिक तपासात खरातच्या आर्थिक साम्राज्याची धक्कादायक पद्धत समोर आली आहे. नाशिकमधील दोन विशिष्ट पतसंस्थांमधील शेकडो खात्यांवर अशोक खरातने स्वतःला ‘वारसदार’  म्हणून नोंदवले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार झाले, त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल क्रमांक लिंक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व बेनामी खाती खरात स्वतः हाताळत होता. लोकांचे आधार आणि पॅन कार्ड मिळवून त्यांच्या संमतीशिवाय ही खाती उघडण्यात आली होती.
घोटाळ्याची कार्यपद्धती 

नाशिक जिल्ह्यातील दोन पतसंस्थांमधील शेकडो खात्यांवर अशोक खरात स्वतः ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवलेला आहे. ज्या खात्यांवरून करोडोंचे व्यवहार झाले, त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व खाती अशोक खरात स्वतःच हाताळत होता आणि त्यातून त्याने काळा पैसा पांढरा केल्याचा संशय ‘एसआयटी’ला (SIT) आहे.

SIT कडून कसून चौकशी सुरू
या आर्थिक गैरव्यवहारानंतर आता एसआयटीने आपला मोर्चा संबंधित दोन पतसंस्थांकडे वळवला आहे. या दोन्ही पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस खाती उघडताना नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.