Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"महिला स्वतःहून..."; माजी मंत्र्यांच्या विधानाने नवा वाद, महिला संघटना आक्रमक

​"महिला स्वतःहून..."; माजी मंत्र्यांच्या विधानाने नवा वाद, महिला संघटना आक्रमक


राज्य सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेल्या एका व्यक्तीने महिलांबद्दल अत्यंत निंदनीय, वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल करुन, त्यांची नावं, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावे” असं वादग्रस्त विधान माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलं आहे.
त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार. दुसरा महिलेने स्वतःहून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावं गुप्तच राहिली पाहिजेत. हे समाजाकरीता चांगलं आहे” असं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे. 
“मात्र ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करुवून घेतले अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणावे हे माझे तसेच राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आहे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत. स्वार्थाकरीता, पैशाकरीता बलात्कार करवून घेण्याचे प्रकार कमी होतील” असं सुबोध सावजी म्हणाले.

‘महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात’

“भोंदू बाबा, संत, महात्मे, महाठग, आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला निरनिराळया ठिकाणी जावून बलात्कार करवून घेतात, या बलात्कारीत महिलांची नावे जाहिर करावयाची नाहीत असा शासन निर्णय आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामुळे राज्यातील जनतेसह आपणास अशी विनंती आहे की, ज्या महिला स्वतःहून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण हे सर्व शासनाने जाहीर करावे” असं सुबोध सावजी म्हणाले. आपण या बाबत शासनास निर्देशीत करावे, असेही राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आता माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या या विधानाने कोणते वादळ उठते, ते लवकरच समजेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.