Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 'तिकीट' वॉर: जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनीच विशाल पाटलांचा गेम केला; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

सांगलीत 'तिकीट' वॉर: जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनीच विशाल पाटलांचा गेम केला; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा


सांगली: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळण्यामागे बाहेरील शक्ती नाही, तर घरचेच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी संगनमत करून विशाल पाटलांचे तिकीट कापले, असा दावा करत पडळकरांनी सांगलीच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

​पडळकर काय म्हणाले.
ठरवून केलेला गेम: जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी २०२४ च्या निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी आधीच 'फिक्सिंग' केली होती. ​विश्वजित कदमांचा 'इव्हेंट': विश्वजित कदम विशाल पाटलांच्या पाठीशी उभे असल्याचे जे चित्र दिसत होते, ते केवळ स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी केलेले मार्केटिंग होते. तो एक पूर्वनियोजित इव्हेंट होता.

​विशाल पाटील अपक्ष लढतील आणि जिंकतील असे या नेत्यांना वाटले नव्हते. विशाल यांनी बंडखोरी करताच या दोन्ही नेत्यांची 'हवा' गेली, अशी बोचरी टीका पडळकरांनी केली. ​महाविकास आघाडीची उमेदवारी आधीच विकली गेली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. "मी कोणत्याही प्रकारची 'आतली' मदत विशाल पाटलांना केली नाही. माझा पक्ष भाजप आणि उमेदवार संजयकाका पाटील होते, त्यांच्यासाठीच मी प्रामाणिकपणे काम केले. मी असल्या 'धंद्यात' पडत नाही."
गोपीचंद पडळकर, आमदार (भाजप)

​२०२९ च्या मैदानाचा इशारा ​यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बोलताना पडळकरांनी विश्वजित कदम यांना थेट आव्हान दिले. "आता फार मोठ्या बाता मारण्याची गरज नाही, २०२९ चे मैदान जवळच आहे आणि तिथे आम्ही समोरासमोर असूच," असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आत्ताच फुंकले आहे. ​सांगलीच्या या 'इनसाईड स्टोरी'मुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या नवीन फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.