Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्य उत्पादन शुल्कात 'वसुलीचा महामेरू'; शिष्याने गुरूलाही टाकले मागे, परमिट रूम मंजुरीसाठी लाखांची 'सुपारी

राज्य उत्पादन शुल्कात 'वसुलीचा महामेरू'; शिष्याने गुरूलाही टाकले मागे, परमिट रूम मंजुरीसाठी लाखांची 'सुपारी


सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या एका 'हिरो'ची जोरदार चर्चा सुरू असून, या महाशयांनी आपल्या कारनाम्यांनी चक्क आपल्या गुरूलाही (रावसाहेब) मागे टाकले आहे. परमिट रूमचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी या बहाद्दराने अक्षरशः दुकानदारी थाटली असून, प्रत्येक फाईलमागे लाखांच्या बोली लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

​वसुलीचे 'रेट कार्ड' उघड!
मिळालेल्या माहितीनुसार, या 'हिरो'ने परमिट रूमच्या प्रस्तावांसाठी आपले स्वतंत्र रेट कार्ड तयार केले आहे.

​प्रस्ताव सादर करण्यासाठी: सुरुवातीलाच ५०,००० रुपयांची आगाऊ रक्कम.

​मंजुरी मिळाल्यावर: २ ते २.५० लाख रुपयांची मागणी. 

​कागदपत्रांनुसार जादा दर: एन.ए. (NA) नसणे, पोलीस रिपोर्टमध्ये त्रुटी असणे यांसारख्या तांत्रिक बाबींचे 'निराकरण' करण्यासाठी कागदपत्रांच्या स्वरूपानुसार वेगळी माया गोळा केली जाते.
वरिष्ठांचे 'वरदहस्त' की अर्थपूर्ण साटेलोटे?

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, हा सर्व काळाबाजार वरिष्ठांच्या मर्जीशिवाय होणे अशक्य आहे. गेल्या २-३ वर्षांत या हिरोने अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेकडो नवीन परमिट रूमना मंजुरी मिळवून दिली आहे. अधीक्षक कार्यालय आणि संबंधित अधिकारी यांच्यातील 'साटेलोट्या'मुळेच हा 'गफला' राजरोसपणे सुरू असल्याची कैफियत खुद्द परमिट रूम मालकांनी मांडली आहे.

​भ्रष्टाचाराचा 'हायवे' मोकळा!
कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या भक्कम साथीमुळे हा 'हिरो' सध्या विभागाचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. वरिष्ठांचा वाटा वेगळा काढून, स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या या शिष्याने भ्रष्टाचारात आपल्या गुरूलाही धोबीपछाड दिली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या 'हिरो'चा बुरखा फाडणार का? की भ्रष्टाचाराची ही 'मद्यधुंद' गाडी अशीच धावत राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश....




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.