Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संदीप घुगे यांची अखेर उचलबांगडी! मनसेच्या आंदोलनाला यश; आता तरी सांगली 'भयमुक्त' होणार का? तानाजीराव सावंतांचा रोखठोक सवाल

संदीप घुगे यांची अखेर उचलबांगडी! मनसेच्या आंदोलनाला यश; आता तरी सांगली 'भयमुक्त' होणार का? तानाजीराव सावंतांचा रोखठोक सवाल


सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी, नाशाखोरी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडूनही याबाबत सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. “भयमुक्त-नाशमुक्त सांगली” या अभियानाच्या माध्यमातून या मुद्द्यांवर वारंवार आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, आज संदीप घुगे यांची बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली होती. गुन्हेगारी आणि नाशाखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.” ते पुढे म्हणाले, “आम्ही वेळोवेळी प्रशासनाला याबाबत इशारा दिला होता. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.”

नवीन येणाऱ्या पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा व्यक्त करत सावंत म्हणाले, “आता तरी सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था सुधारावी. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी आणि नाशाखोरी करणाऱ्यांवर लगाम घालावा. नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देणे अत्यंत गरजेचे आहे.”
दरम्यान, सांगलीकर नागरिकांमध्येही नव्या पोलीस अधीक्षकांकडून ठोस आणि परिणामकारक उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त होत असून, जिल्ह्यातील बिघडलेली परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून, कायदा-सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. या बिघडलेल्या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार धरले जाणारे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची अखेर बदली झाली आहे. या निर्णयामुळे सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे. ​"केवळ बदली करून चालणार नाही, तर नवीन येणाऱ्या अधीक्षकांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सांगलीला पुन्हा सुरक्षित करावे," अशी आक्रमक भूमिका सावंतांनी मांडली आहे.
​सावंत पुढे म्हणाले की, "आम्ही 'भयमुक्त-नाशमुक्त सांगली'साठी वारंवार ओरडून सांगत होतो, पण प्रशासनाचे डोळे उघडायला उशीर झाला. जिल्ह्यात नाशाखोरी आणि गुंडगिरी बोकाळली असताना पोलीस प्रशासन सुस्त होते. आता नवीन अधिकाऱ्यांनी तरी खुर्चीची प्रतिष्ठा राखावी आणि सर्वसामान्यांना गुंडांच्या दहशतीतून मुक्त करावे, अन्यथा मनसे स्टाईलने जाब विचारला जाईल."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.