Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विमानतळ प्रवेशावरून महापौरांचा पारा चढला; कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश, पण मूळ 'प्रोटोकॉल' अधिकारीच गायब!

विमानतळ प्रवेशावरून महापौरांचा पारा चढला; कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश, पण मूळ 'प्रोटोकॉल' अधिकारीच गायब!


महापौर मंजुषा नागपुरे यांना प्रवेश पास नसल्याने पुणे विमानतळावर आलेल्या महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे महापौर नागपुरे यांनी थेट महापालिका आयुक्तांकडे विमानतळाचा पास न काढल्याबाबत प्रभारी जनसंपर्क अधिकार्‍यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा आहे. महापौरांच्या या निर्णयामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर महापालिका निवडणुका होऊन पदाधिकारी आले आहेत. शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर शहरात येणार्‍या मंत्री महोदयांचे विमानतळावर स्वागतासाठी आवर्जुन हजर असतात. सभागृह नव्याने अस्तित्वात आले असले तरी अद्यापपर्यंत महापौर मंजुषा नागपुरे यांचा विमानतळाचा प्रवेश पास काढण्यात आला नव्हता. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीसाठी महापौरांना विमानतळ प्रवेश पास दिला जातो. महापौरांचे फोटो, आधार कार्ड, निवडीचे पत्र आदी आवश्यक कागदपत्रांचा समावेश असतो. एका दिवसाच्या पाससाठीदेखील आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता आवश्यक असते.
सोमवारी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौर्‍यावर होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी महापौर कार्यालयाने विमानतळ प्रवेश पास काढण्याबाबत प्रभारी जनसंपर्क अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अल्पावधीत पास काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे महापौर नागपुरे यांना मंत्र्यांचे स्वागत करता आले नाही. परिणामी महापौरांनी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

नगरसचिव की जनसंपर्क अधिकारी जबाबदार!
सध्याच्या नगरसचिव योगिता भोसले यापूर्वी राजशिष्टाचार अधिकारी होत्या. भोसले यांची नगरसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे. या पदाचा प्रभारी चार्ज देखील कोणाकडे दिलेला नाही. त्यामुळे या पदाची जबाबदारी नक्की कोणाकडे आणि पाससाठी जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी रविवारी रात्री विमानतळावर प्रवेश करण्याचा पास काढण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्याशी बोलणे झाले. तीन वर्षांच्या कालावधींसाठीचा पास लवकरात लवकर काढला जाईल. यासाठी महापौर कार्यालयाच्या संपर्कात आहे.

– योगेश हेंद्रे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी, पुणे महापालिका.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.