Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- अतिक्रमणे हटवा आणि नालेसफाईला गती द्या! आयुक्त संजीता महापात्र यांचा कुपवाड दौऱ्यात 'ऑन द स्पॉट' दणका

सांगली :- अतिक्रमणे हटवा आणि नालेसफाईला गती द्या! आयुक्त संजीता महापात्र यांचा कुपवाड दौऱ्यात 'ऑन द स्पॉट' दणका


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीम. संजीता महापात्र यांनी रविवारी कुपवाडमधील प्रभाग क्रमांक २ आणि ८ मध्ये धडक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी केवळ कागदावर काम न पाहता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून विकासकामांचा आढावा घेतला. दौऱ चैत्रबन नाला आणि खारी मळा ते आनंद नगर नाल्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. विकास कॉलनी व झेडपी कॉलनी परिसरातील अतिक्रमणे तत्काळ हटवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
लक्ष्मी मंदिर ते सूतगिरणी चौक रस्ता रुंदीकरण आणि कुपवाड चिल्ड्रन पार्कच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा: वि. स. खांडेकर अभ्यासिकेच्या भेटीदरम्यान त्यांनी तिथे MPSC/UPSC अभ्यास केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत IAS/IPS अधिकाऱ्यांची व्याख्याने आणि नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
​यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज पाटील यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. आयुक्त महापात्र यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे कुपवाडमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.