Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत रणशिंग; जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर पहिला धडक मोर्चा!

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत रणशिंग; जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर पहिला धडक मोर्चा!


सांगली: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुमारे ९०० एकर सुपीक जमीन बाधित होणार असल्याने, या प्रकल्पाविरोधात आता आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात 'हा महामार्ग रद्द करा' असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला असून, या लढ्याचे नेतृत्व आमदार जयंत पाटील करणार आहेत.
या दडपशाहीविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. हा प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा नसून केवळ काही लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारा असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. महामार्गामुळे पूरस्थिती ओढवेल आणि मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल, अशी भीती डॉ. भारत पाटणकर आणि अभिजित पाटील यांनी व्यक्त केली.
"स्वप्नात आलेल्या देवांपैकी कोणालाच हा रस्ता नकोय, पण एका 'देवा'ला मात्र ही जमीन हवीय," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला. तालुक्यातील कोणत्याही गावात मोजणी होऊ दिली जाणार नाही आणि ग्रामसभांमधून प्रकल्पाच्या विरोधात ठराव केले जातील. ​या मेळाव्याला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.