मुंबई-पुणे महामार्गावर 61 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 4 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात हा सर्वात मोठा ट्राफिक जाम झाला होता. यानंतर आता महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा ट्राफिक जाम पहायला मिळाला. 40 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोलापूर-धुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हजारो वाहने या ट्राफिक जाममध्ये अडकली. या अभूतपूर्व ट्राफिक जामचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रातील धाराशीव जिल्ह्यात ही सगळी वाहने निघाली होती. मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी 15 लाखांहून अधिक भाविक येत असल्याने सोलापूर-धुळे महामार्गावर वाहनांची अचानक प्रचंड गर्दी झाली. जवळपास 40 किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. महाराष्ट्रातील या प्रमुख महामार्गावरील वाहतूक कोंडीचे धक्कादायक ड्रोन व्हिडिओ व्हायरल आले आहेत. महामार्गावर दूरवर पसरलेल्या वाहनांच्या रांगा पाहून धडकी भरत आहे. वाहनाांची रांग इतकी दूरपर्यंत पसरली आहे याचा शेवट कुठे आहे तेच समजेना असे या व्हिडिओत दिसत आहे. सामान्य लोकांव्यतिरिक्त, अनेक व्हीआयपीदेखील या वाहतूक कोंडीत अडकल्याचे वृत्त आहे. भाजपचे एक नेतेही या प्रचंड कोंडीत जवळपास अडीच तास अडकल्याचे वृत्त आहे.येडेश्वरी जत्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. यावर्षी ती 30 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चालणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या सणादरम्यान होणाऱ्या पालखी महोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मिरवणुकीसाठी 15 लाखांहून अधिक भाविक येत आहेत. प्रचंड गर्दीमुळे मोठ्या प्रमाणातील व्यवस्था अपुरी पडत आहे. येडेश्वरी यात्रेसाठी भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे सोलापूर-धुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी सुमारे 40 किलोमीटर लांब असल्याचे वृत्त आहे. ड्रोन फुटेजमध्ये मैलोन् मैल वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.