भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियमने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण २५० रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार bharatpetroleum.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कोणती पदे भरली जाणार?
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह: २१० पदे
सेक्रेटरी (बीपीसीएल): ८ पदे
असोसिएट एक्झिक्युटिव्ह: ३२ पदे
पात्रता काय?
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियर): मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/केमिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि किमान ५ वर्षांचा अनुभव.ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): इंटर CA / इंटर CMA सोबत पदवी.सेक्रेटरी: १०वी, १२वी उत्तीर्ण आणि किमान ३ वर्षांची बॅचलर पदवी.क्वालिटी अश्युरन्स असोसिएट एक्झिक्युटिव्ह: मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. पदवी.
अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना शुल्क देखील भरावे लागेल. जनरल, ओबीसी, एनसीएल आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹१,१८० भरावे लागतील. यामध्ये अर्ज शुल्क म्हणून ₹१,००० आणि जीएसटी म्हणून ₹१८० यांचा समावेश आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे.
इतका पगार मिळेल?
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदासाठी निवड झाल्यावर ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.