Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाणी समजून घातक द्रव प्राशन; दोन वर्षांच्या अद्विकचा दुर्दैवी अंत

पाणी समजून घातक द्रव प्राशन; दोन वर्षांच्या अद्विकचा दुर्दैवी अंत 


नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा चिमुकला घरात खेळत होता. खेळता खेळता त्याने घरात असलेल्या एका बाटलीतील पाण्यासारखं दिसणारं द्रव्य पाणी समजून प्यायला. मात्र यानंतर त्याची प्रकृती खालावली. ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरही त्याचा जीव वाचवू शकले नाहीत.
अद्विक श्याम भदाडे असं मृत पावलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे.घटनेच्या दिवशी मंगळवारी तो आपल्या घरात खेळत होता. खेळता खेळता तो स्टोअर रुमकडे गेला. इथं त्याला एक बाटली दिसली. बाटलीत पाणी सदृश्य द्रव्य होतं. त्याने पाणी समजून हे द्रव्य प्राशन केलं. ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अद्विकचे वडील श्याम भदाडे केटरींगचं काम करतात. ते आपल्या कुटुंबासह वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगाव येथे वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी भदाडे यांनी आपल्या घरी रंगकाम करून घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी रंग कामासाठी आवश्यक असणारं टर्पेंटाइन केमीकल विकत घेतलं होतं.
रंगकाम संपल्यानंतर उरलेलं टर्पेंटाइन त्यांनी बाटलीत ओतून ती बाटली स्टोअररूममध्ये ठेवली होती. मात्र मंगळवारी घरातील सदस्य इतर कामात व्यस्त असताना अद्विक खेळता खेळता त्या बाटलीजवळ गेला आणि त्याने पाणी समजून टर्पेंटाइन प्राशन केलं. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो जीवाच्या आकांताने तळमळू लागला. दोन वर्षांच्या अद्विकची ही अवस्था बघून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चिमुकल्या अद्विकचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.