Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

:...अन्यथा तुमच्यावरही होईल कारवाई! घरासमोर गाडी उभी करण्याबाबत कायदा काय सांगतो? ९९ लोकांना माहीतच नाही

:...अन्यथा तुमच्यावरही होईल कारवाई! घरासमोर गाडी उभी करण्याबाबत कायदा काय सांगतो? ९९ लोकांना माहीतच नाही


मुंबई : घरासमोर गाडी पार्क करण्यावरून होणारे वाद आजकाल सामान्य झाले आहेत. अनेक वेळा हे वाद सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतात. मात्र, अशा परिस्थितीत भांडण करण्याऐवजी कायद्याचा आधार घेत योग्य मार्गाने प्रश्न सोडवणे अधिक सुरक्षित आणि योग्य ठरते.

रस्ता सार्वजनिक मालमत्ता, पण 'राइट ऑफ वे' महत्त्वाचा
कायद्यानुसार रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे केवळ 'घरासमोर जागा आहे' या कारणावरून कोणालाही पूर्णपणे पार्किंग करण्यास रोखता येत नाही. मात्र, प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात अडथळ्याविना ये-जा करण्याचा 'राइट ऑफ वे'हा महत्त्वाचा अधिकार आहे.
गेटसमोर गाडी उभी केल्यास कारवाई शक्य

जर एखाद्या वाहनामुळे तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासमोर अडथळा निर्माण होत असेल, तर ते कायद्याने चुकीचे ठरते. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२६ (Wrongful Restraint) तसेच Motor Vehicles Act, 1988 अंतर्गत कारवाई होऊ शकते. या परिस्थितीत तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना माहिती देऊ शकता. संबंधित वाहनावर दंड आकारला जाऊ शकतो किंवा ते टो करून हटवले जाऊ शकते.

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यासही तक्रार करता येते
गाडी थेट गेटसमोर नसली तरी ती रस्त्यावर अशा प्रकारे पार्क केली असेल की, ज्यामुळे वाहतूक कोंडी, हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषण किंवा सार्वजनिक त्रास होत असेल तर त्याविरोधातही तक्रार करता येते. अशा घटना 'पब्लिक न्यूसन्स' अंतर्गत येतात. यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १५२ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
तक्रार कशी करावी?

अशा परिस्थितीत तुम्ही खालील पर्यायांचा वापर करू शकता जसे की,
ट्रॅफिक पोलिसांना फोन करून माहिती देणे.
जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणे.
आवश्यक असल्यास वाहन टो करून हटवण्याची मागणी करणे.

'या' गोष्टी टाळा, नाहीतर तुमच्यावरच कारवाई
वाद सोडवताना काही गोष्टी टाळणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की, दुसऱ्याच्या गाडीचे नुकसान करणे, टायर पंक्चर करणे, जबरदस्तीने वाहन हटवणे, सार्वजनिक रस्त्यावर 'प्रायव्हेट पार्किंग' असा फलक लावणे अशा कृती केल्यास तुमच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.