Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उत्पादन शुल्क विभागाचे 'पळपुटे' अधिकारी; ड्राय डे ला जनतेला वाऱ्यावर सोडून 'होम टाऊन'ला पळ!:,कोल्हापूर विभागीय उपायुक्तांचा वचक संपला? सलग ३ दिवस सुट्ट्यांच्या नावाखाली कर्तव्य धाब्यावर!

उत्पादन शुल्क विभागाचे 'पळपुटे' अधिकारी; ड्राय डे ला जनतेला वाऱ्यावर सोडून 'होम टाऊन'ला पळ!:, कोल्हापूर विभागीय उपायुक्तांचा वचक संपला? सलग ३ दिवस सुट्ट्यांच्या नावाखाली कर्तव्य धाब्यावर!


महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून प्रशासनाने 'ड्राय डे' जाहीर केला असला तरी, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात दारूचा महापूर वाहण्याची शक्यता आहे. याला कारणीभूत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा अत्यंत बेजबाबदार आणि 'पळपुटा' स्वभाव! सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याचे पाहून या विभागाच्या अनेक महाभागांनी आजच आपले कार्यक्षेत्र सोडून घराकडे (Home Town) पळ काढला आहे. मग उद्याच्या 'ड्राय डे'ला कायद्याचा वचक राहणार कोणाचा? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

​मैदान सोडून पळणारे कसले 'रक्षक'?
अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते अधिकारीच जर सुट्टी साजरी करण्यासाठी कार्यक्षेत्र सोडून गायब होत असतील, तर हे जिल्हावासीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. "साहेब आजच घरी पळाले आहेत" ही बातमी सर्व लायसन्सधारकांना आणि अवैध धंदेवाल्यांना आधीच मिळाली आहे. त्यामुळेच 'ड्राय डे'च्या दिवशी बिनदिक्कतपणे चढ्या दराने दारू विक्री करण्याचे धाडस या विक्रेत्यांचे वाढले आहे.

​कोल्हापूर विभागीय उपायुक्त झोपलेत का?
​विभागीय उपायुक्तांचे आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांवर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही, हे या 'पळवापळवी'वरून स्पष्ट होत आहे.

​कारवाईचा केवळ फार्स: अधिकारीच हजर नसतील तर धाडी कोण टाकणार? आणि गुन्हे कोण नोंदवणार?

​अवैध विक्रेत्यांशी 'अर्थपूर्ण' साटेलोटे? अधिकारी कार्यक्षेत्र सोडून जाण्यामागे अवैध विक्रेत्यांना रान मोकळे करून देण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका आता घेतली जात आहे.

​हजेरीची तपासणी होणार का? मुख्यालय सोडून पळणाऱ्या या दांडीबहादूर अधिकाऱ्यांवर उपायुक्त कठोर कारवाईचा बडगा उगारणार की त्यांच्या या कृत्याकडे डोळेझाक करणार?
​जनतेचा आक्रोश; प्रशासनाचा मूकपाठिंबा!

​एकीकडे सरकार व्यसनमुक्तीच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे 'ड्राय डे'लाच सर्वाधिक दारू विकली जाते. जेव्हा रक्षकच रणांगण सोडून पळ काढतात, तेव्हा अवैध धंदेवाल्यांचे फावते. कार्यक्षेत्र सोडून पळ काढणाऱ्या अशा कामचोर अधिकाऱ्यांमुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रतिमा मलिन होत आहे.

​"उद्या जर जिल्ह्यात कोठेही अवैध दारू विक्री झाली, तर त्याला मुख्यालय सोडून पळालेले 'ते' अधिकारीच जबाबदार असतील. आता कोल्हापूर विभागीय उपायुक्तांनी तात्काळ 'ऑन फिल्ड' रिपोर्ट मागवून या पळपुट्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल!" जर उद्या ड्राय डे असताना एखादा डुप्लिकेट मद्य पिऊन मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? आयुक्त कोणाला जबाबदार धरणार हा खरा प्रश्न आहे 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.