Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र दिन गौरव: सांगलीच्या अपर अधीक्षक कल्पना बारवकर, निरीक्षक किरण चौगले यांच्यासह ८०० जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

महाराष्ट्र दिन गौरव: सांगलीच्या अपर अधीक्षक कल्पना बारवकर, निरीक्षक किरण चौगले यांच्यासह ८०० जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर


महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलात उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या राज्यातील ८०० अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. या मानाच्या यादीत सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी आपले नाव कोरले आहे. 

या सन्मानामध्ये सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली आणि कोल्हापूरच्या (ना.ह.सं.) अधीक्षक ज्योती क्षीरसागर यांचाही समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


पदक विजेत्यांची आकडेवारी:
​उप महानिरीक्षक: ४
​उपायुक्त/अपर अधीक्षक: १०
​उपविभागीय अधिकारी: २६
​निरीक्षक: ६४
​सहायक निरीक्षक: २७
​उपनिरीक्षक: ७४
​हवालदार/शिपाई व इतर: ५९५
​परिक्षेत्रातील प्रमुख मानकरी:

सांगलीतून कल्पना बारवकर आणि किरण चौगले यांच्यासह हवालदार सागर टिंगरे, आमिरशा फकीर, मारुफहुसेन चमनशेख आणि भावना सूतगुंडे यांना हा बहुमान मिळाला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमधील अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व अंमलदारांचा यामध्ये समावेश आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.