Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापूराव खराडे यांचा ज्ञानवारसा आता जनतेसाठी खुला; विजयनगर येथे 'वाचन कक्षा'चे भव्य लोकार्पण

बापूराव खराडे यांचा ज्ञानवारसा आता जनतेसाठी खुला; विजयनगर येथे 'वाचन कक्षा'चे भव्य लोकार्पण


सांगली:– विजयनगर येथील स्व. श्री. सुरजमलजी रतनचंद्रजी लुक्कड वाचनालयात दैनिक ‘ललकार’चे संस्थापक स्व. बापूराव दत्तात्रय खराडे यांच्या नावाचा विशेष ‘वाचन कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन प.पू. झेंडे महाराज, माजी खासदार संजयकाका पाटील आणि कवी महेश कराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

स्व. बापूराव खराडे यांनी आपल्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत सुमारे ४ हजार दुर्मिळ आणि अमूल्य ग्रंथांचा संग्रह केला होता. समाजातील वाचन संस्कृती जपली जावी, या उदात्त हेतूने खराडे परिवाराने हा संपूर्ण वैयक्तिक ग्रंथसंग्रह विजयनगर येथील शासनमान्य लुक्कड वाचनालयाला देणगी म्हणून दिला आहे. या देणगीची दखल घेत प.पू. झेंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाच्या परिसरात खास ‘स्व. बापूराव खराडे वाचन कक्ष’ उभारण्यात आला आहे. 
या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक घोरपडे, चंद्रकांत क्षीरसागर, सावकार शिराळे, निमिश कारंडे यांच्यासह खराडे परिवारातील श्रीमती विमल खराडे, दैनिक ‘ललकार’चे संपादक सुभाष खराडे, सौ. अरुणा खराडे, ऋषिकेश खराडे, सौ. वेदिका खराडे आणि अमरनाथ खराडे उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी बापूराव खराडे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा आणि त्यांच्या ग्रंथप्रेमाचा गौरव केला. एका पत्रकाराने आयुष्यभर जतन केलेला ज्ञानाचा ठेवा आज सर्वसामान्य वाचकांसाठी खुला होणे, ही सांगलीच्या सांस्कृतिक चळवळीसाठी मोठी घटना आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.