मंडणगड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, विविध केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी वेळोवेळी भेट देत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात गावाचा चेहरा बदलण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्णच आहे.
गेल्या काही वर्षांत आंबडवे येथे स्मारक विकास, पर्यटन केंद्र उभारणीच्या घोषणा केल्या होत्या. उच्चपदस्थांच्या भेटीनंतर योजनांची चर्चा रंगली; पण त्या बहुतेक कागदावरच राहिल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे गावात तात्पुरती स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, रोषणाई आणि कार्यक्रमांची लगबग दिसत असली, तरी वर्षभर पाणीपुरवठा, रस्ते, पर्यटन सुविधा आणि माहिती केंद्राचा अभाव कायमच आहे.
महामानवाचे मूळ गाव म्हणून देशभर ओळख असलेल्या आंबडवेचा अजूनही अपेक्षित विकास का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंबडवे ही केवळ नतमस्तक होण्यापूर्ती स्फूर्तीभूमी राहिली आहे का, की ती विचारांचे आणि विकासाचे प्रेरणास्थान म्हणून उभी राहणार, याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या जयंतीनिमित्त होऊ घातलेल्या कार्यक्रमात तरी घोषणांच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जातील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे पुन्हा उजळते; पण हा उजेड केवळ काही दिवसांचाच असतो. राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री यांच्या भेटी होतात. व्यासपीठावरून विकासाच्या घोषणा केल्या जातात आणि नंतर सर्व काही शांत होते. जयंती आली की, आंबडवे सजते, स्वच्छता होते, रस्त्यांवर डांबर पडते, कार्यक्रमांची रेलचेल वाढते; पण जयंती संपताच वास्तव समोर येते. अपूर्ण सुविधा, रखडलेले प्रकल्प आणि मूलभूत गरजांसाठी झगडणारे गाव असेच चित्र आहे.-आदेश मर्चंडे, नगरसेवकअपेक्षित विकासाच्या मागण्याराष्ट्रीयस्तरावरील अत्याधुनिक स्मारक व संग्रहालयपर्यटनासाठी सुसज्ज सुविधा (निवास, मार्गदर्शन केंद्र)दर्जेदार रस्ते व वाहतूक व्यवस्थास्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती'प्रेरणास्थळ' म्हणून आंबडव्याची ओळख मजबूत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.