Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सासूने उघडले अशोक खरात यांचे गुपित; मुलीबद्दल केला खळबळजनक दावा!

सासूने उघडले अशोक खरात यांचे गुपित; मुलीबद्दल केला खळबळजनक दावा!


नाशिक महिला अत्याचार, फसवणूक आणि इतर आरोपांखाली अटकेत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला दर दिवशी नवी वळणं मिळत आहेत. अनेक पुरावे, खरातच्या घरांसह कार्यालयांवरील धाडी पाहता समोर येणारी माहिती यंत्रणांनाही हादरवून सोडतानाच आता एका महत्त्वाच्या व्यक्तीनं अनेक दावे केल्यानं एकच खळबळ माजली आहे. ही व्यक्ती म्हणजे खरातच्या पत्नीची आई.

खरातच्या सासूबाईंनी सगळंच सांगितलं...
अशोक खरातची पत्नी, कल्पना खरात मागील पंधरा दिवसांपासून नसल्याने तिच्या आईने चिंता व्यक्त केली आहे. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही असं सांगत इतक्या दिवसांत ती माहेरी आलेली नाही असंही कल्पनाच्या आईनं म्हटलं. कल्पना खरात यांच्या आई मुलीच्या चिंतेने भावूक झाल्या असल्याचच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं.
'मला काहीच सांगता येणार नाही. मला माझ्या जीवाचे पडलेले आहे कल्पना खरात इथे नाही यामुळे मला करमत नाही. एक दिवस ती माहेरी आलेली नाही. आता पंधरा दिवसापासून कुठे आहे माहिती नाही', असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. 'कल्पना एक दिवस कधी माहेरी आली नाही की कुठे गेली नाही मात्र पंधरा दिवसापासून नाहीये, इतक्या दिवसापासून ती नाही त्यात माझी तब्येत खराब असल्याने मी अस्वस्थ आहे. त्यामुळे मला काही विचारू नका' असं सांगत कल्पना खरात यांच्या आईंनी सदर प्रकरणावर वक्तव्य केलं. कल्पना खरात यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असून सध्या अशोक खरातच्या पत्नीच्या शोधासाठी पोलीस पथकही मागावर आहेत.


'अशोक खरातचा एन्काऊंटर करतील'; काँग्रेस खासदाराचा दावा
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा मोठा दावा. भोंदू अशोक खरातचा हे लोक एन्काऊंटर करतील. 2023 ला महिला विधेयक मंजूर करण्यात आले मात्र मोदी सरकारने त्याच्या अंमलबजावणीसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावलं. मुळात जनगणना न करता हे पन्नास टक्के महिला आरक्षण विधेयक आणत आहेत. राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे. मी देखील कोणत्याही जयंतीसाठी वर्गणी देत नाही. महापुरुषांच्या विचाराच्या अनुषंगाने जे उपक्रम राबवतात त्यासाठी मी मदत करते. बाबासाहेबांच्या संविधानाची देशाला आज नितांत गरज आहे. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी अनेक सत्तेतल्या लोकांची माहिती समोर येईल त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असं शिंदे म्हणाल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.