Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती; पाहा पात्रता.

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत विविध पदांसाठी भरती; पाहा पात्रता.


पुणे : शासकीय किंवा निमसरकारी विभागात नोकरीमिळावी, यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. या प्रयत्नातूनच काहींना नोकरी मिळते तर काहींना वाटच पाहावी लागते. असे असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळू शकणार आहे. या ठिकाणी विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी २२ एप्रिल २०२६ रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 22 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. त्यात खुला 38 वर्ष आणि राखीव 43 वर्ष असा गट असणार आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड झालेल्या उमेदवाराला 40000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी www.nmmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

22 एप्रिलला होणार मुलाखत
या भरती प्रक्रियेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यात 22 एप्रिलला मुलाखत घेतली जाणार आहे. सदर मुलाखत ही आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.