Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बदलीचा 'चौकार'! ४ सनदी अधिकाऱ्यांचे नवीन आदेश; जी. श्रीकांत यांची अवघ्या १५ दिवसांत बदली.

बदलीचा 'चौकार'! ४ सनदी अधिकाऱ्यांचे नवीन आदेश; जी. श्रीकांत यांची अवघ्या १५ दिवसांत बदली.


मुंबई : राज्यातील आयएसएस  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका सुरुच असून कालच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आज पुन्हा एकदा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या चार अधिकाऱ्यांमध्ये जी. श्रीकांत यांचाही समावेश आहे. जी श्रीकांत हे सध्या नवी मुंबई जल जीवन मिशन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजीच त्यांची जल जीवन मिशन नवी मुंबई येथे मिशन संचालक पदावर बदली करण्यात आली होती. त्यामुळे, गेल्या 15 दिवसांत ही त्यांची दुसरी बदली आहे.
जी.श्रीकांत हे 2009 च्या युपीएससी बॅचचे आयएएस अधिकारी असून गेल्या 15 दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर मनपाचे आयुक्त होते. मात्र, 3 एप्रिल रोजी अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई येथे त्यांची बदली करण्यात आली होती, ते तिथे कार्यरतही होते. आता, त्यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग, येथे नियुक्ती करण्यात आली. तर, जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांची GST, मुंबई सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पापळकर हे 2010 च्या युपीएससी बॅचचे IAS अधिकारी आहेत.

जी. श्रीकांत यांच्याजागी गंगाथरण डी. यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गंगाथरण हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यासह, जगदीश मिनियार मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची महिला व बालक आयुक्त पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मिनियार हे 2015 च्या बॅचचे युपीएससी उत्तीर्ण अधिकारी आहेत. दरम्यान, कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते, त्यानंतर आज आणखी चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काल 15 एप्रिल रोजी बदली केलेले अधिकारी
डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: 2014), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: 2015), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे. यासह, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम (आयएएस: आरआर: 2020), यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी येथे बदली करण्यात आली आहे. कुशल जैन (आयएएस: आरआर: 2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना यवतमाळ येथे प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.