Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

TCS प्रकरणातील आरोपी शफी शेखवर तुरुंगात हल्ला; ७-८ कैद्यांनी मिळून बेदम चोपले!

TCS प्रकरणातील आरोपी शफी शेखवर तुरुंगात हल्ला; ७-८ कैद्यांनी मिळून बेदम चोपले!


नाशिक : कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडणाऱ्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी शफी शेख याला कारागृहात कैद्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. स्वत: आरोपीने कोर्टात ही माहिती दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका महिलेसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक महिला आरोपी फरार आहे.
नाशिकच्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पीडित महिलांनी या एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत शफी शेख आणि रझा मेननला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. 18 एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे. शफीवर 4 तर रझावर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींवर पीडितेचा विनयभंग, मानसिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. 
नेमकं जेलमध्ये घडलं काय?

गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण होत असल्याची घटना समोर आली. शफी शेख याच्यावर एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणे, तिला मानसिक त्रास देणे आणि धक्कादायक म्हणजे धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शेखविरोधात विनयभंग आणि मानसिक अत्याचारासह एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत. मागील सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

7 ते 8 कैद्यांनी दिला बेदम चोप
समोर आलेल्या माहितीनुसार, कारागृहात असताना शफी शेखला इतर 7 ते 8 कैद्यांनी बेदम चोप दिला आहे. या मारहाणीमुळे शेख भयभीत झाला असू त्याने नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींसमोर या घटनेचा पाढा वाचला. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप इतके संतापजनक होते की, त्याचे पडसाद आता कारागृहातील गुन्हेगारांमध्येही उमटल्याचे या घटनेवरून दिसून येते.

टीसीएससारख्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपनीत घडलेला हा प्रकार कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. पीडितेला न्याय मिळवून देणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, हीच आता काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.