Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सूर्य कोपला! महाराष्ट्रात ५० अंशांचा धोका; शाळांना सुट्ट्या जाहीर, हवामान बदलाचा मोठा इशारा.

सूर्य कोपला! महाराष्ट्रात ५० अंशांचा धोका; शाळांना सुट्ट्या जाहीर, हवामान बदलाचा मोठा इशारा.


मागील 48 तासांमध्ये राज्यात कुठंही पावसाची हजेरी नसून, उलटपक्षी उकाडा वाढल्याचं चित्र आहे. विदर्भातील अकोल्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, अमरावततीही पारा 44 अंशांवर पोहोचल्यानं आता हा आकडा हाफ सेंच्युरिपर्यंत जातोय का? हीच भीती व्यक्त केली जाच आहे. दरम्यान, उकाडा प्रचंड वाढत असल्याच्या धर्तीवर 16 एप्रिल 2026 रोजी वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि मध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान तापमान 43 ते 45 अंशांदरम्यान असून उष्माघाताचा धोका वाढल्यानं प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे.

शाळांना रजा...
वर्ध्यातील ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरु शकते. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना एप्रिल रोजी सुटी जाहिर केली. हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार जिल्ह्यात 15 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट देण्यात आला होता. शिवाय वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासुन वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तिव्रता वाढली असून अशा परिस्थितीत उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
तर, राज्यातील इतर जिल्हे आणि शहरांमध्येसुद्धा उष्णतेची तीव्रता पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. गरज नसल्यास घरातच थांबण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला असून, यादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भात होरपळ सुरू झालेली असतानाच कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट असेल असा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पारा चाळीशीपार गेला आहे. राज्यात उष्ण वाऱ्यांची स्थिती पाहता सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि वर्धा इथं उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावतील असा इशारा जारी करण्यात आला आहे.

देशात रातोरात भयंकर हवामान बदल...
IMD च्या माहितीनुसार उत्तर भारतातही मागील 3 दिवसांपासून एकाएकी उकाडा वाला असून, सकाळपासूनच तीव्र सूर्यकिरणांमुळं अंगाची काहिली होताना दिसत आहे. अशा स्थितीत अतिशय महत्त्वाचा अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसम स्थिती असून, याचा फटका मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशाला बसणार आहे. तर, दक्षिण भारतात हवामान अंशत: ढगाळ आणि दमट असेल. पूर्वोत्तर भारतात पावसाचं सत्र सुरूच राहणार आहे, ज्यामुळं तापमान नियंत्रणात राहील. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी कमी तीव्रतेचा एक पश्चिमी झंझावात हिमालय क्षेत्रात प्रवेश करत आहे. ज्यामुळं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांत हलका पाऊस, हिमवर्षावाची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.