Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत संताप! लिफ्ट बंद असल्याने बीडीओंची चक्क 'पालखी'; कर्मचाऱ्यांनी खुर्चीसह उचलून नेले.

सांगलीत संताप! लिफ्ट बंद असल्याने बीडीओंची चक्क 'पालखी'; कर्मचाऱ्यांनी खुर्चीसह उचलून नेले.


सांगली : जिल्हा परिषदेत सोमवारी शिराळ्याच्या दिव्यांग गटविकास अधिकारी स्नेहल नौकुडकर यांना चक्क खुर्चीतून उचलून वरच्या मजल्यावर नेण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद असल्याने हा खटाटोप करावा लागला. जिल्हा परिषदेतील लिफ्ट वारंवार बंद पडते. दिव्यांग नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी आणि सामान्यांना याचा त्रास वारंवार सहन करावा लागतो आहे. सोमवारी दिव्यांग गटविकास अधिकारी नौकुडकर यांनाही याचा फटका बसला. त्या दुसऱ्या मजल्यावर बैठकीसाठी आल्या होत्या.
मात्र, लिफ्ट बंद असल्याने त्यांची मोठी अडचणीचा सामना करावा लागला. अखेरीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खुर्चीत बसवून वर नेले. ही लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने नागरिक बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहेत. काही महिन्यांपूर्वी तीन ते चार कर्मचारी जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्येच अडकून पडलेले होते. शेवटी सळीने दरवाजा कटवून त्यांना बाहेर काढावे लागले होते. त्यानंतर दरवाजा बदलला. काही सुधारणाही केल्या, पण त्यानंतरही लिफ्टचे रडगाणे संपले नाही. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यालाच त्रास झाला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.