सांगली महापालिकेच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ते नाव म्हणजे काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण. केवळ पद उपभोगणे नव्हे, तर 'काम एके काम' हाच आपला धर्म मानणाऱ्या या अवलियाने आपल्या कार्यपद्धतीने अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
संकट काळात सामान्यांचा आधार
महापालिका असो की हॉस्पिटल, कोणत्याही ठिकाणी अडकलेले काम मार्गी लावण्यात मंगेश चव्हाण यांचा हातखंडा आहे. रुग्णालयात रक्ताची गरज असो, बेड मिळवून देणे असो किंवा प्रशासकीय पातळीवरील गुंता सोडवणे असो; रात्रीचा १ वाजलेला असो वा पहाटेचे ४, हा नेता मदतीसाठी सदैव तत्पर असतो. म्हणूनच आज सामान्यांच्या मनात एकच भावना आहे – "मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश!"
महापालिकेत प्रशासनावर वचक
विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनातील त्रुटींवर नेहमीच बोट ठेवले आहे. वॉर्डातील विकासकामे असोत किंवा शहराचे प्रलंबित प्रश्न, मंगेश चव्हाण यांचा अभ्यास आणि आक्रमकता यामुळे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यांचे काम 'परफेक्ट' असते, असा विश्वास केवळ त्यांच्या वॉर्डातीलच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यांतून कामासाठी येणाऱ्या लोकांमध्येही निर्माण झाला आहे.जिल्ह्याच्या सीमा ओलांडून मदतीचा हातमंगेश चव्हाण यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ आपल्या वॉर्डापुरते मर्यादित नाहीत. सांगली जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या गरजूंच्या मदतीलाही ते तितक्याच तत्परतेने धावून जातात. कामाची कोणतीही अट न ठेवता, केवळ समोरच्याचे दुःख पाहून धावून जाणारा हा 'लोकनेता' आज कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा स्रोत बनला आहे.आक्रमक चेहरा: काँग्रेस पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत विरोधकांना सळो की पळो करून सोडणारेनेतृत्व.हुकमी एक्का: कोणत्याही संकटात हमखास निकाल देणारा नेता.कार्यतत्परता: २४ तास जनसंपर्क आणि कामाचा धडाका.सांगलीच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे मंगेश चव्हाण हे येणाऱ्या काळात लोकसेवेचे नवे आदर्श निर्माण करतील, यात शंका नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.