धक्कादायक: उत्पादन शुल्क विभागात ‘हिरो’चा समांतर कारभार! ४०-५० बारचे ‘खाते’ बायपासच्या आलिशान ऑफिसमधून!
सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या एका ‘हिरो’ची जोरदार चर्चा आहे. सरकारी नियम आणि कायदे धाब्यावर बसवून सांगली जिल्ह्यातील तब्बल ४० ते ५० परमिट रूम आणि बिअर बारचा संपूर्ण कारभार हा ‘हिरो’ एका खासगी ‘बायपास’ ऑफिसमधून चालवत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयात असायला हवे असलेले व्यापाऱ्यांचे 'सरकारी रजिस्टर' या हिरोच्या आलिशान ऑफिसमध्ये ठाण मांडून आहेत, तिथूनच अर्थकारणाचा सगळा ‘खेळ’ खेळला जात आहे.
सरकारी यंत्रणा ‘ओलीस’? की ‘हिरो’चाच वरचष्मा?
मिळालेल्या माहितीनुसार, मिरज झोन, सांगली झोन, कवठेमहांकाळ, जत आणि इस्लामपूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील रेंज ऑफिसरकडे जाणारे प्रस्ताव आधी या ‘हिरो’च्या दरबारात हजेरी लावतात.प्रस्तावांचा प्रवास: परमिट रूम, बिअर बार आणि बिअर शॉपीचे सर्व नवीन प्रस्ताव किंवा नूतनीकरण आधी या खासगी ऑफिसमध्ये ‘स्कॅन’ होतात. फक्त सहीचा सोपस्कार: संबंधित रेंज ऑफिसर्सकडून येणारे प्रस्ताव या हिरोच्या ऑफिसमध्ये तपासले जातात आणि तिथे ‘हिरवा कंदील’ मिळाल्यावरच ते केवळ सहीसाठी अधिकाऱ्यांच्या टेबलावर जातात, अशी खळबळजनक चर्चा आहे.
आलिशान ऑफिस अन् 'भरमसाठ' उलाढाल
बायपास येथील या आलिशान ऑफिसमधून केवळ कागदोपत्री काम चालत नाही, तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक घडामोडी पार पाडल्या जात असल्याचा आरोप होत आहे. परमिट रूम मालकांना सरकारी कामासाठी थेट कार्यालयात जाण्याऐवजी या ‘मध्यस्थाच्या’ कार्यालयाची पायरी चढावी लागत आहे. सरकारी दप्तरातील नोंदी खासगी जागेत कशा काय असू शकतात? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
"सरकारी कार्यालयाचा कारभार एखाद्या खाजगी व्यक्तीच्या ऑफिसमधून चालणे हा गंभीर प्रकार आहे. प्रशासनाने या 'हिरो'च्या आलिशान अड्ड्यावर छापा टाकून ती सरकारी रजिस्टर ताब्यात घ्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल."
बातमीतील मुख्य मुद्दे:
समांतर प्रशासन: सरकारी रेंज ऑफिसर्सना हाताशी धरूनखासगी व्यक्तीचा कारभार.रजिस्टर गायब: शासनाचे अधिकृत रेकॉर्ड खासगी ऑफिसमध्ये असणे बेकायदेशीर.जिल्हाभर जाळे: सांगलीतील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील बार मालकांवर दबाव.आर्थिक देवाणघेवाण: प्रस्तावांच्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल.आता या ‘हिरो’वर आणि त्याला साथ देणाऱ्या संबंधित ‘रेंज ऑफिसर्स’वर वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश.......
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.