Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे-ठाकरे गुप्त भेटीच्या वृत्ताने खळबळ; काय आहे 'त्या' भेटीमागचं सत्य?

शिंदे-ठाकरे गुप्त भेटीच्या वृत्ताने खळबळ; काय आहे 'त्या' भेटीमागचं सत्य?


राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी दिल्लीतील नेतृत्त्वाने एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी शिंदे पडद्यामागे अजूनही यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी एकनाथ शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात आहेत. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री 'ऑपरेशन टायगर'च्या  अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. 

यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, ही चर्चा पुन्हा रंगली आहे. उद्धव ठाकरे  यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
तर ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, मी काही झालं तरी शिंदे सोबत जाणार नाही. तर ओमराजे निंबाळकर यांनीही, 'मी दोन टर्मचा खासदार आहे. माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर फोटो द्यावेत, असे आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिले.

मी श्रीकांत शिंदेंच्या घरी बैठकीसाठी गेलोच नव्हतो. संजय देशमुख
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी झालेल्या कथित बैठकी प्रकरणी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी स्पष्ट नकार दिला आहे. मी प्रत्यक्ष वा ऑनलाइन बैठकीत उपस्थित नव्हतो. या बैठकीचे मला ना निमंत्रण होते, ना मला कोणी बोलावले होते. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही आणि मी गेलोही नाही, ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची कोणतीही बैठक झाली नाही: नागेश पाटील आष्टीकर

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या आठ खासदारांची ठाण्यामध्ये एक गुप्त बैठक घेतल्याच्या माहिती समोर येत आहे. यामध्ये हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होते अशी सूत्रांची माहिती आहे. या संदर्भात आम्ही नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी स फोनवर दिलेल्या माहितीनुसार, अशा कोणत्याही बैठकीला मी हजर नव्हतो. या बातम्यांना काही अर्थ नाही किंवा अशी कोणती बैठक झाली आहे या संदर्भात मला माहिती सुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे.

मी दोन दिवसांपासून पुण्यात आहे कुठल्याही बैठकीचा काही संबंध नाही: संजय जाधव
मी दोन दिवस झालं पुण्यामध्ये आहे. त्यामुळे त्या बैठकीचा आणि माझा काहीही संबंध नाही, मी कुठल्याही बैठकीला गेलो नाही, ना कुणाशी माझा संपर्क झालेला आहे. माझं काम चालू आहे आणि पक्षांतराचा सध्या तरी कुठलाही विषय नाही. अशी प्रतिक्रिया परभणीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी टएबीपी माझाटशी फोनवरून बोलताना दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.