Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"महिला नको म्हणून मंत्र्याने नाव कापलं!" :, मनीषा म्हैसकर

"महिला नको म्हणून मंत्र्याने नाव कापलं!" :, मनीषा म्हैसकर


मुंबई : राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर  यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्याने 'माझा विभाग चालवायला मला महिला नको' असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर यांनी हा अनुभव मांडला.

'महिला नको' म्हणत डावलले
मनिषा म्हैसकर यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय की, 'माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ एकदाच असा अनुभव आला. 2023 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान एका नेत्याने 'माझा विभाग चालवायला मला महिला सचिव नको' असं सांगितलं आणि ते धक्कादायक.'
 नेमकं काय म्हणाल्या मनीषा मैसकर?

"खरे तर महिला - पुरुष भेद अत्यंत पुसट झाले आहेत. पण 2023 मध्ये सरकार स्थापन झाले, तेव्हा माझ्या खात्यासाठी मला महिला सचिव चालणार नाही, अशी भूमिका एका मंत्र्यांनी घेतली होती. हे धक्कादायक होते. पण माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत असा केवळ एकच अनुभव आला.

अर्थात महिला अधिकाऱ्यांनी कायम वेळेचे व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. उत्तम टीम उभी करायची असते. प्रशासकीय यशाचे रहस्य तुमची टीमवर्क किती चांगले करता यावर अवलंबून असते. विविध समाज माध्यमांवर सक्रिय असण्याचे कारण, मला व्यक्त व्हायला आवडते.

महायुती सरकारमधील मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप?
या वक्तव्यामुळे मनिषा म्हैसकर यांनी महायुती सरकारमधील त्या मंत्र्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 2023 मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता.

दरम्यान, मनीषा म्हैसकर यांनी स्पष्ट केलं आहे की, त्या एका घटनेव्यतिरिक्त आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा अनुभव आलेला नाही. मात्र महिला अधिकाऱ्याने इतक्या वरिष्ठ पातळीवर असा अनुभव मांडल्याने प्रशासनातील लिंगभेदाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीतील संमेलनात उल्लेख

महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेत हा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या संमेलनात महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवांवर चर्चा होणार आहे.

प्रतिक्रिया येण्याची शक्यता
या वक्तव्यावर अद्याप संबंधित मंत्री किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मनिषा म्हैसकर यांच्या या वक्तव्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.