Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :- ​बाई, जेजेची जमीन आणि १०८ वर्षांचं रहस्य!

मुंबई :- ​बाई, जेजेची जमीन आणि १०८ वर्षांचं रहस्य! 


मुंबई:  एखादी हिंदी वेबसिरीज होईल, अशी कथा सध्या राज्य शासनाच्या अखत्यारीतील जेजे रुग्णालयात घडत आहे. तीन वर्षांपूर्वी एक ९५ वर्षीय माजी परिचारिका जेजे रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले, 'आम्ही पिकनिकसाठी मढ आयलंड येथे जायचो. ती जागाही आपली जेजेचीच आहे.' मग काय, अधिकाऱ्यांचे कुतूहल जागे झाले. या संवादाचा संदर्भ घेऊन त्यांनी संबंधित जागेची माहिती घेणे सुरू केले. तेव्हा, १० एकर जमीन जेजे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशनच्या नावाने समुद्रकिनारी असलेल्या मढ आयलंड येथे १०८ वर्षांपासून असल्याचे समजले. आता या जागेचा विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुनावणीसाठी पोहोचला आहे.

तत्कालीन ब्रिटिश सरकारने १ ऑगस्ट १९१७ रोजी जेजे रुग्णालयाला 'कॉन्व्हलसन्ट होम, चिल्ड्रेन्स होम अँड आऊट हाउसेस' या नावाने लहान मुलांच्या टीबी उपचाराकरिता १० एकर जागा भाडेपट्ट्याने दिली होती. त्या काळी टीबीवर प्रगत उपचार नव्हते. अशावेळी बालकांना ताजी हवा, चांगले वातावरण मिळावे, उपचारात मदत व्हावी, यासाठी ही जागा दिली गेली. त्यानंतर काही दानशूर व्यक्तीही मदतीसाठी पुढे आले होते. मात्र, 'जेजे'ला तेव्हा थेट आर्थिक मदत स्वीकारता येत नव्हती.

त्यामुळे निधी मिळावा, याकरिता जागेचे नाव 'जेजे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशन' करण्यात आले. त्यानंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्याने काही हजार रुपयांची देणगी देण्याची इच्छा दर्शवत तळमजल्यातील बॅरेकला 'लेडी क्लार्क' असे नाव देण्याची विनंती केली. त्यानुसार ते नावही दिले गेले. वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आजही तशी नोंद आहे. पुढे १९१७ साली नाममात्र शुल्क आकारून ही जागा जेजे रुग्णालयाला ५० वर्षांसाठी देण्यात आली. त्यानंतर १९६७-६८ साली ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या जागेच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.