नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अशातच पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत.
राज्याच्या नगर विकास परिवहन सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हिंजवडी आयटी पार्क मधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील जेंट्स रेस्ट रूम मध्ये एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधी करण्यात येतात आणि तिथे इतर कर्मचाऱ्यांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात येतात, असा गंभीर आरोप माधुरी मिसाळ यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे लिहिलेल्या पत्रात केली आहे.
पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी करून इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी चिंताजनक आहेत. कार्यस्थळी भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. पुणे पोलिस आयुक्तांना सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान हक्क, सुरक्षितता आणि सन्मान मिळालाच पाहिजे. कंपनीच्या विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधीसाठी होत असल्यास चौकशी जाली पाहिजे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
हिंजवडी परिसरातील कंपन्यांमध्ये विश्रांती गृहांचा वापर नियमित धार्मिक विधीसाठी होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही परिस्थिती खरी असेल तर इतर कर्मचाऱ्यांच्या समसमान हक्क आणि संस्थात्मक शिस्तीवर गंभीर परिणाम होत आहे. संबंधित कंपन्यांमध्ये होत असलेल्या ह्या गोष्टींवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करा. नाशिक येथील एका कंपनीत झालेल्या धर्मांतराच्या गंभीर घटनेचा दाखला देत माधुरी मिसाळ यांनी पोलिस आयुक्तांना पत्र दिलं आहे. मागच्या आठवड्यात पुणे आणि परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मिसाळ यांनीच पुढाकार घेतला होता. तर आता नाशिकप्रमाणेच पुण्यातल्या आय टी क्षेत्रात कोणतीही चुकीच्या घटना घडू नये यासाठी वेळीच दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांना पत्र लिहून केली आहे.
माधुरी मिसाळ यांच्या पत्रात नेमकं काय आहे?
मला विविध स्रोतांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष यांच्या वापराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आणि त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचान्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वरील माहिती ही अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नसून, तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे.विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने काउन्सलिंग/संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ क्रिया अनुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे त्तरी सदर विषय संवेदनशील असंध्ध्याने, आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.