Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"भाजपचा 'हा' नेता दुसरा अशोक खरात"; शिंदेंच्या आमदाराचा बलात्काराचा गंभीर आरोप

"भाजपचा 'हा' नेता दुसरा अशोक खरात"; शिंदेंच्या आमदाराचा बलात्काराचा गंभीर आरोप


भाजप आणि शिंदेंसेनेतील वाद बुलढाण्यात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गाडकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदेंवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. विजयराज शिंदे हा दुसरा अशोक खरात आहे. त्याने त्याच्या शाळेत शिकत असणाऱ्या कितीतरी पोरी बरबाद केल्या आहेत, त्याने कितीतरी पोरींची इज्जत लुटली आहे, असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदेंवर केला आहे. संजय गायकवाड यांच्या आरोप भाजप जिल्हाध्यक्ष शिंदेंनी खोडून काढले आहेत. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने बुलढाण्याचे राजकारण तापलेय.

आमदार संजय गाडकवाड यांचा नेमका आरोप काय?

विजयराज शिंदे हा दुसरा अशोक खरात आहे. त्याच्या शाळेत शिकत असलेल्या कितीतरी पोरी त्याने बरबाद केल्या. कितीतरी पोरींच्या इज्जती त्याने लुटल्या आहेत, असा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. या वादात आता वंचितनेही उडी घेतली असून गाडकवाड यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शाळेत शिकणाऱ्या आजी व माजी विध्यार्थिनींची आणि त्यांच्या पालकांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.
बुलढाण्यात शिवसेना आमदार विरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातच आता वंचितनेही उडी घेतली आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचेच माजी आमदार व सध्या भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले विजयराज शिंदे यांच्यावर आरोप केले. शिंदे यांनी त्यांच्याच निवासी शाळेतील अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. शिंदे यांनी अनेक विद्यार्थीनीचे आयुष्य बरबाद केलं, असा आरोप केला.
त्याशिवाय संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा किंवा त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या आजी-माजी विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकांची माफी मागावी, असेही म्हटले आहे. विजयराज शिंदे यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींच्या जीवनात आता वाद होत आहेत, अनेक विद्यार्थिनी व पालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. संजय गायकवाड यांनी माफी न मागितल्यास वंचित जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.