Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- भा.प्र.से. संजीता मोहपात्रा १५ एप्रिल रोजी स्वीकारणार आयुक्तपदाचा कार्यभार

सांगली :- भा.प्र.से. संजीता मोहपात्रा १५ एप्रिल रोजी स्वीकारणार आयुक्तपदाचा कार्यभार


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या श्रीम. संजीता मोहपात्रा (भा.प्र.से.) यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच सांगलीकरांना आवाहन केले आहे. आपल्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंबा हार आणण्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तकेअथवा शाळे साहित्य भेट द्यावीत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. संजीता मोहपात्रा यांची बदली सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्या बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

पुष्पगुच्छापेक्षा ज्ञानाची भेट मौल्यवान!
नूतन आयुक्तांनी त्लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना आवाहन केले आहे की: स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंवा हार आणू नयेत. त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे साहित्य किंवा प्रेरणादायी पुस्तके भेट द्यावीत.

ही जमा झालेली सर्व पुस्तके महानगरपालिकेच्या शाळांतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व ग्रंथालयांसाठी वापरली जातील. महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिक आणि हितचिंतकांना या अभिनव 'पुस्तक  आणि शाळे साहित्य दान' चळवळीत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.