राज्यात उकाडा वाढत आहे. नागरिक हैराण आहे. तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटांचे परिणाम जीवघेणे ठरत आहेत. पुण्यात शेतात काम करत असताना एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, जळगावमध्येही उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट हाहाकार माजवत आहे. सूर्यदेव कोणत्याही परिस्थितीत कोणालाही सोडायला तयार नाही. गावांमध्ये वीज लपंडाव खेळत असताना, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे एका महिला शेतकऱ्याचा बळी गेला. सोमवारी निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना रूपाली भाऊ गाडगे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. रूपाली सकाळी ११:४५ च्या सुमारास आपल्या शेतात काम करत होत्या.दुपारच्या तीव्र उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे तिला अचानक चक्कर आली आणि ती कोसळली. तिला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना, दुपारी १२ ते ४ या वेळेत काम न करण्याचे आवाहन केले आहे.
लातूरमध्ये ९ महिन्यांचा मुलीचा दुर्देवी मृत्यू
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या गोंद्री गावात उष्माघाताने एका ९ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ती मुलगी एका पत्र्याच्या घरात पाळण्यात झोपली होती. तीव्र उष्णता आणि उष्माघातामुळे तिच्या शरीरातील पाणी कमी होऊन तिचा दुर्देवी मृत्यू झाला.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.अकोला - 46.9°Cअमरावती - 46.8°Cवर्धा - 46.4°Cयवतमाळ - 46°Cयाशिवाय नागपूर आणि चंद्रपूरमध्ये तापमानही सुमारे ४४-४५ अंश आहे.
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि दुपारच्या वेळी बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.