Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सांगली हादरली: पोळ्यांचा नैवेद्य अन् खुनाचा उलगडा!"

"सांगली हादरली: पोळ्यांचा नैवेद्य अन् खुनाचा उलगडा!"


सांगली : मयतविधी करुन भावकीच्या घरा-घरात सूतक सुटले म्हणून पोळ्या वाटल्याने बारा दिवसांपूर्वी झालेल्या खूनाला गुरुवारी वाचा फुटली. अनैतिक संबंधात अडथळा करत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मुलांच्या सहकार्याने मृतदेहावर अग्निसंस्कार केल्याची घटना करोली टी (ता.कवठेमहंकाळ) याठिकाणी उघडकीस आली. खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी महिलेसह चौघांना पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिली.

करोलीतील भारत इराप्पा कर्पे वय (५८) याचा दि. २८ मार्च रोजी रात्री पत्नी निलाबाई व तिचा प्रियकर बाबाजी कर्पे या दोघांनी प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून काठीने मारहाण केली. यानंतर गळा आवळून खून केला. आत्महत्या भागवण्यासाठी मृतदेह खिडकीला अडकवला. तथापि, गल्लीत दंगा ऐकू गेला असणार म्हणून रात्रीच मृतदेह कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्याठिकाणी अति दारू पिऊन मृत झाल्याचे सांगितले.

यानंतर घरी नेऊन मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आले. तथापि, गेले दहा दिवस गावात दबक्या आवाजात खून झाल्याची चर्चा सुरु होती. पोलीसांनाही गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कसून चौकशी केली असता खूनाला आज वाचा फुटली. या खून प्रकरणी महिला व तिचा प्रियकर यांना तर पुरावा नष्ट केला म्हणून दोन मुले मनोज व अनिकेत कर्पे यांनाही अटक करण्यात आली असल्याचे निरीक्षक कांबळे यांनी सांगितले. मयताचा कार्य विधी करत असताना भावकीच्या घरात पोळ्या वाटप करण्यात आल्या‌ यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाल्याने बारा दिवसांनी खून उघडकीला आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.