Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"प्रशासनाचा दणका!":,​शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी: मिरजेत सरकारी आदेश धुडकावणाऱ्या शिक्षकांचा 'हिशोब' चुकता

"प्रशासनाचा दणका!":,​शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी: मिरजेत सरकारी आदेश धुडकावणाऱ्या शिक्षकांचा 'हिशोब' चुकता


देशभरात 1 एप्रिलपासून जनगणना 2026-27 च्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणनेचं काम शिक्षकांच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. तसा आदेश निवडणूक आयोगाने काढला असून याला आता काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. नुकताच नागपूरमध्ये या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती. जनगणना प्रक्रियेत सहभागी होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तब्बल 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

या कारवाईनंतर राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. तोच आता सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. तर दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागात संताप व्यक्त केला जात आहे.

देशभरात जनगणना 2026-27 चे काम सुरू झाले असून नागपूर महापालिकेने देखील जनगणना प्रक्रिया सुरू केली आहे. त्या प्रमाणे शिक्षण विभागातील कर्मचारी आणि शिक्षकांची नियुक्ती जनगणना प्रक्रियेत करण्यात आली आहे. पण तब्बल 10 जणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यास टाळाटाळ केली. ज्यानंतर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील सहाय्यक आयुक्तांनी संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. ज्यात जनगणना प्रक्रियेसाठी देण्यात आलेले आदेश न पाळणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तसेच IPC कलम 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एक प्राचार्य, चार शिक्षक, एक मुख्याध्यापक अशा एकूण 10 शैक्षणिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत सहभाग टाळल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर महानगरपालिकेने राष्ट्रीय कर्तव्य टाळणाऱ्यांना इशारा देताना, जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार आणखीही गुन्हे दाखल होऊ शकतात, असे म्हटले होते.

दरम्यान सांगली जिल्ह्यातही अशाच पद्धतीने मिरज येथील विद्या मंदिर शाळा आणि कन्या शाळेतील एक-एक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक सुधाकर बाबासाहेब बंडगर आणि शिक्षिका निर्मल मल्लू वाघमारे अशी शिक्षकांची नावे आहेत. तर त्यांच्यावर मतदार पुनरीक्षणाच्या कामास नकार दिल्याने मिरज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनगणना मोहिमेंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून काम करण्याची जबाबदारी या दोघांना मिरज तहसीलदारांच्या मतदार पुनरीक्षण आदेशानुसार देण्यात आली होती. मात्र, या संबंधित दोन्ही शिक्षकांनी या कामासाठी नकार दिला व कामावर अनुपस्थित राहिले. यामुळे मंडळधिकारी अमोल सानप यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ज्यानंतर शिक्षक सुधाकर बाबासाहेब बंडगर आणि शिक्षिका निर्मल मल्लू वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.