Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भाजप-शिवसेनेला पुन्हा दणका; सुहास बाबरांच्या गटात फूट, सभापती बिनविरोध! विशाल पाटलांचे भाकीत ठरले खरे!

सांगलीत भाजप-शिवसेनेला पुन्हा दणका; सुहास बाबरांच्या गटात फूट, सभापती बिनविरोध! विशाल पाटलांचे भाकीत ठरले खरे!


सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. चारही समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक टळली. बांधकाम समिती सभापतीपदी शिंदे सेनेचे पृथ्वीराज पाटील, महिला व बालकल्याण समितीवर स्नेहल मोरे, शिक्षण समितीवर सावित्री तांमगोंडा पाटील आणि समाजकल्याण समितीवर दादासाहेब कोळेकर यांची निवड निश्चित झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांमध्येही महाविकास आघाडी, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी आपली पकड कायम ठेवली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.