"Amazon-Flipkart सेलमध्ये पार्सल येतंय? कचऱ्यात बॉक्स टाकण्यापूर्वी 'हे' काम नक्की करा, अन्यथा होईल डेटा चोरी!"
ऑनलाइन सेलचा सीझन सुरू झाला की प्रत्येक घरात पार्सल्सचा ढीग येतो. नवीन वस्तू काढून आनंद साजरा करताना आपण रिकामा बॉक्स सहज कचऱ्यात टाकतो. पण हा साधा बॉक्स तुम्हाला मोठ्या फसवणुकीचा बळी बनवू शकतो. या 'डिलिव्हरी बॉक्स घोटाळ्या'बद्दल जाणून घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.
डिलिव्हरी बॉक्स घोटाळा म्हणजे काय?
जेव्हा तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर मिळते, त्या बॉक्सवर शिपिंग लेबल असते. त्यावर तुमचे पूर्ण नाव, मोबाइल नंबर, घरचा पत्ता आणि ऑर्डरचे तपशील स्पष्ट दिसतात. बॉक्स न फाडता किंवा लेबल न पुसता कचऱ्यात टाकलात की ही वैयक्तिक माहिती घोटाळेबाजांसाठी सोपे शिकार बनते. ते कचरा गोळा करून लेबल्समधून तुमची सर्व डिटेल्स काढून घेतात.
घोटाळेबाज कसा सापळा रचतात?
घोटाळेबाज प्रथम तुमचा बॉक्स गोळा करतात. मग ते तुम्हाला फोन करून स्वतःला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे कस्टमर सपोर्ट म्हणून ओळखवतात. तुमचे नाव आणि पत्ता आधीच माहिती असल्याने तुम्ही सहज विश्वास ठेवता. ते म्हणतात, "तुमच्या ऑर्डरबद्दल फीडबॅक द्या, कॅशबॅक किंवा अतिरिक्त सवलत मिळेल." बोलताना ते एक लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या फोनमध्ये मालवेअर घुसते किंवा बनावट वेबसाइट उघडते. तिथे तुमचे बँक डिटेल्स, OTP आणि पासवर्ड चोरले जातात. अशा प्रकारे अनेक लोकांचे पैसे गेले आहेत.
सेलमध्ये का वाढते धोका?
सेलच्या काळात हजारो ऑर्डर्स होतात. त्यामुळे रस्त्यावर आणि कचऱ्यात डिलिव्हरी बॉक्सेसची संख्या खूप वाढते. लोक ऑफर्स आणि फीडबॅक कॉल्सची अपेक्षा करतात, त्याचा फायदा घेऊन घोटाळेबाज सहज विश्वास संपादन करतात. म्हणून सध्या हे प्रकरणे अधिक वाढली आहेत.
स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे?
लेबल नेहमी फाडून टाका: बॉक्स टाकण्यापूर्वी लेबल पूर्णपणे फाडून टाका किंवा ब्लॅक मार्करने नाव, पत्ता, नंबर पूर्ण झाकून टाका.अनोळखी लिंक्स टाळा: कोणत्याही SMS किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या कॅशबॅक लिंकवर क्लिक करू नका. खऱ्या कंपन्या अशा पद्धतीने लिंक पाठवत नाहीत.फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका: अनोळखी व्यक्ती तुमचे नाव आणि पत्ता सांगून ऑफर देईल तर लगेच विश्वास ठेवू नका. कंपनीच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवरून स्वतः तपासा.थोडीशी खबरदारी घेतली तर सेलचा आनंद कसा घ्या तसाच तुमचे पैसे आणि डेटाही सुरक्षित राहील. कचरा टाकताना एकदा विचार करा कारण हा बॉक्स फक्त कार्डबोर्ड नाही त्यात तुमची वैयक्तिक माहिती दडलेली असू शकत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.