सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील दळणवळण अधिक सक्षम आणि सुकर व्हावी, या उद्देशाने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून ५१ लाख ३५ हजार रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये रस्ते सुधारणा आणि गटार कामांचा समावेश असून, यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
लोकार्पण करण्यात आलेल्या कामांचा तपशील:
पेठभाग भाजी मंडई परिसर: अंतर्गत रस्ते सुधारणा (२५ लाख १८ हजार रु.)बाळकृष्ण मालवणकर ज्वेलर्स ते बाबू मास्तर घोरपडे चौक: रस्ता डांबरीकरण (८ लाख ४३ हजार रु.)नवसंदेश बोळ: रस्ता व गटार बांधकाम (१७ लाख ६९ हजार रु.)यावेळी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, "प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देणे ही आमची प्राथमिकता आहे. यापुढील काळातही विकासकामांचा हा वेग कायम राहील."या कार्यक्रमाला नगरसेवक केदार खाडीलकर, उदय बेलवलकर, नगरसेविका अनिताताई पवार, मनीषाताई कुकडे, नितीनकाका शिंदे, संदीप कुकडे, रवींद्र वादवणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, उद्योजक प्रशांत शहा, सारंग साळुंखे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.