संख (सांगली): जत तालुक्यातील संख परिसरातील पांडोझरी गावच्या हद्दीत मध्यरात्री एक थरारक घटना घडली आहे. महावितरणमध्ये लिपिक (क्लार्क) म्हणून कार्यरत असलेल्या संतोष उर्फ कुमार बिराजदार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बिराजदार हे काल मध्यरात्री पांडोझरी गावच्या हद्दीतून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, गोळी लागल्याने बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
अनैतिक संबंधाचा संशय?
प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या वैयक्तिक कारणातून किंवा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी या दिशेने तपास चक्राला वेग दिला असून, याप्रकरणी उमदी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.अज्ञात हल्लेखोर कोण होते आणि हत्येचे नेमके कारण काय, याचा उलगडा अद्याप अधिकृतपणे झालेला नाही. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सरकारी कर्मचारी वर्गात आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.