Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! पाकिस्तान हादरला! लष्कराच्या ट्रेनला लक्ष्य करत बलुच बंडखोरांचा भीषण आत्मघाती हल्ला; २६ जणांचा मृत्यू

Big Breaking! पाकिस्तान हादरला! लष्कराच्या ट्रेनला लक्ष्य करत बलुच बंडखोरांचा भीषण आत्मघाती हल्ला; २६ जणांचा मृत्यू


इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे रविवार रोजी सकाळी एक अत्यंत भीषण आत्मघाती हल्ला झाला. बलुच लिबरेशन आर्मीच्या  मजीद ब्रिगेडच्या एका आत्मघाती हल्लेखोराने 'जाफर एक्सप्रेस'  या ट्रेनला लक्ष्य करत स्वतःला बॉम्बने उडवून दिले.

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की ट्रेनची एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या भीषण आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत किमान २६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला पाकिस्तानी लष्कराला मोठा झटका असल्याचे सांगण्यात येते.

लष्कराच्या जवानांना केले लक्ष्य
मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस ही ट्रेन क्वेटा कॅन्टोन्मेंटवरून पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना घेऊन जात होती. ट्रेन चमन फाटकजवळ पोहोचली असता, रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ दबा धरून बसलेल्या आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवले. लष्कराचे जवान या ट्रेनमध्ये असल्यानेच हा सुनियोजित आत्मघाती हल्ला करण्यात आल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. स्फोटानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला असून सर्वत्र चेंगराचेंगरी आणि हाहाकार माजला.
दूरवर ऐकू आला आवाज; घरे आणि वाहनांचे अतोनात नुकसान

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की अनेक किलोमीटर दूरपर्यंत तो ऐकू आला. स्फोटानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट उसळले होते. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला असलेली अनेक घरे आणि तेथे उभी असलेली वाहने यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

युद्धपातळीवर बचावकार्य; 'मजीद ब्रिगेड'कडून हल्ल्याची कबुली
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि लष्कराच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या मिलिटरी हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीचा (BLA) प्रवक्ता जीयांद बलुच याने मीडियाला पत्रक जारी करून या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या 'मजीद ब्रिगेड' या आत्मघाती पथकाने हा हल्ला घडवून आणल्याचे त्याने म्हटले आहे. पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, दहशतवाद्यांचे असे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. सध्या संपूर्ण क्वेटा शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून शोधमोहीम सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.