Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! विट्यात संतापजनक प्रकार! 'तू मागच्या जन्मीची नागीण आहेस' असं सांगत भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर नराधमासारखा अत्याचार!

Big Breaking! विट्यात संतापजनक प्रकार! 'तू मागच्या जन्मीची नागीण आहेस' असं सांगत भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर नराधमासारखा अत्याचार!


विटा (सांगली) : राज्यात खरात प्रकरण ताजे असताना विट्यातील भोंदूबाबाचे प्रकरण उघडकीस  आले. महिलेला नरबळी, गर्भपाताचा सल्ला देणारा संशयित भोंदू महाराज संकेत निकम व त्याचे साथीदार महेश बाबर, सूरज उपाध्याय यांचा आज एक कारनामा समोर आला आहे.
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू महाराज संकेत निकम याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.

याबाबत पीडितेने आज विटा पोलिसांत वरील तिघांविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, महिलेला नरबळी, गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या संशयित भोंदू महाराज महेश बाबर (भवानी माळ, विटा), संकेत निकम (घोगाव, ता. पलूस, सध्या भवानीमाळ, विटा), सूरज उपाध्याय (विटा) या तिघांविरुद्ध गुरुवारी (ता. २१) गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, काल अल्पवयीन मुलीने वरील तिघांविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितेला शारीरिक, पिताशयाचा त्रास असताना संशयित महेश बाबर व संकेत निकम याने, संकेत हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा, चिले महाराज यांचा अवतार आहे. पीडितेच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येत असल्याचे सांगून तिला पूजा, हवन करण्यास भाग पाडले.

पीडिता मागच्या जन्मीची नागीण असून संकेत निकम हा मागच्या जन्मी नाग असून त्यांच्या दोघांचा लग्न करण्यासाठी याजन्मी जन्म झाला असल्याचे सांगितले. निकम याने तो विटा येथे राहत असलेल्या खोलीवर पीडितेसोबत अनेकदा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले आहेत. हा प्रकार १ जून २०२४ पासून ते १२ मे २०२६ पर्यंत सुरू होता. यातील सूरज उपाध्ये याने पीडितेला, 'कोणाला काही सांगू नको, ' असे सांगून, 'संकेत बाबा सर्व बघत आहेत, नाहीतर तुझे व्हिडीओ व्हायरल करेन, ' अशी धमकी दिली.

तसेच महेश बाबर व संकेत निकम यांनी पूजा, हवन करण्यासाठी पीडितेच्या वडिलांकडून निकमच्या वडिलाच्या खात्यावर व रोख पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.