Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नराधम आजोबाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा! ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; बीड हादरले, महाराष्ट्रात संतापाची लाट!

नराधम आजोबाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा! ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; बीड हादरले, महाराष्ट्रात संतापाची लाट!


बीड: महाराष्ट्रात लेकी-बाळी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. पुणे आणि सांगलीतील घटना ताज्या असतानाच, बीडच्या केज तालुक्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. स्वतःच्या ३ वर्षांच्या नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 
युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. पीडित चिमुकली आपल्या आईसोबत माहेरी आली होती. मात्र, ज्या हातांनी नातीला खेळवायचे, त्याच ५० वर्षीय आजोबाने १६ ते २५ एप्रिल दरम्यान चिमुकलीवर वारंवार अत्याचार केला.
​आईची तत्परता आणि पोलिसांची कारवाई 

चिमुकलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने रडत रडत हा प्रकार आईला सांगितला. आपल्याच पित्याने पोटच्या नातीसोबत केलेले हे घृणास्पद कृत्य ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने कोणतीही भीती न बाळगता थेट पोलीस ठाणे गाठले.
​'पिंक पथका'चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तक्रार मिळताच चक्रे फिरवली आणि या नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली असून, संपूर्ण राज्यात या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे."अशा नराधमांना समाजात स्थान नाही, त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे हीच आता जनतेची मागणी आहे."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.