सांगलीत पिस्तूल विक्री करताना गोळीबार; ‘मोका’मधील गुन्हेगारासह तिघांना सांगली ग्रामीण पोलिसांकडून अटक
सांगली :- पिस्तूल विक्रीच्या व्यवहारादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा छडा लावण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिरज येथील एका सराईत 'मोका' मधील गुन्हेगाराचा समावेश आहे.
दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोर, राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सर्व्हिस रोडवर एका कारमध्ये पिस्तूल विक्रीचा व्यवहार सुरू होता. यावेळी पिस्तूल हाताळताना झालेल्या निष्काळजीपणामुळे त्यातून गोळी सुटली (फायरिंग झाले). यामध्ये पिस्तूल खरेदी करण्यासाठी आलेला आरोपी आदित्याकुमार अशोक नाईक हा गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले. गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. आदित्यकुमार अशोक नाईक (वय ३०, रा. एकता कॉलनी, सांगली) - जखमी व आरोपी२. समर्थ संजय गायकवाड (वय २२, रा. १०० फुटी रोड, हाडको कॉलनी, मिरज) - सराईत गुन्हेगार३. शिवतेज सुहास सावंत (वय ३०, रा. कोळेकर मळा, कर्नाळ, ता. मिरज)यातील आरोपी समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून तो नुकताच 'मोका' (MCOCA) मधून बाहेर आला आहे. प्राथमिक तपासात सदर पिस्तूल इंदूर (मध्य प्रदेश) येथून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विष्णू भगवान काळे यांनी फिर्याद दिली असून, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५ (ब), ३(५), आर्म अॅक्ट ३, २५, २५(९) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. बी. ए. तळेकर, पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर, इस्माईल तांबोळी व इतर कर्मचारी सहभागी होते. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.