Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- गायक पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ; 'अँट्रॉसिटी' अंतर्गत गुन्हा दाखल

सांगली :- गायक पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ; 'अँट्रॉसिटी' अंतर्गत गुन्हा दाखल


सांगली :- संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात अँट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटपटु स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यांनी पलाश विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्याची तक्रार सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 
या तक्रारीनुसार पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला असून यामुळे पलाशच्या अडचणीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलाशने विज्ञान माने यांच्याशी २०२५ साली संपर्क साधला होता. त्याने चित्रपट निर्मितीसाठी माने यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी माने यांनी ही रक्कम परत मागितली असता, पलाशने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.