Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हदरली! जत दुहेरी खुनातील मुख्य साक्षीदाराचा 'गेम ओव्हर'; कर्नाटकात संशयास्पद मृत्यू!

सांगली हदरली! जत दुहेरी खुनातील मुख्य साक्षीदाराचा 'गेम ओव्हर'; कर्नाटकात संशयास्पद मृत्यू!


सांगली: जत दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा कर्नाटकात संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीतून अपहरण करण्यात आलेल्या दादासो यमगर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले असून, खुद्द सांगली पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.

​काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातील कोसरी येथे भीषण दुहेरी हत्याकांड घडले होते. या हत्याकांडाचे दादासो यमगर हे मुख्य साक्षीदार होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे सांगलीतून अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच, त्यांचा मृतदेह सीमावर्ती भागात म्हणजेच कर्नाटकात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणावर बोलताना सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, "दादासो यमगर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, हा घातपात आहे की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल (Post-mortem Report) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल."

​साक्षीदाराचा काटा काढण्याचा प्रयत्न?
कोसारी दुहेरी खुनातील आरोपींना वाचवण्यासाठी साक्षीदाराचा मुद्दाम 'गेम' करण्यात आल्याची चर्चा आता जिल्हाभरात रंगली आहे. सांगलीतून अपहरण होऊन कर्नाटकात मृतदेह सापडल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून, या घटनेमुळे जत आणि सांगली परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.