Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'मराठी बोलून दाखवाच'; हिजाबधारी महिलेचं खुलं आव्हान, सोशल मीडियावर वादाला तोंड!

​'मराठी बोलून दाखवाच'; हिजाबधारी महिलेचं खुलं आव्हान, सोशल मीडियावर वादाला तोंड!


मुंबई :  राज्यात ऑटो रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय १ मेपासून लागू होणार होता. मात्र, हा नियम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्यात नव्या भाषिक वादाला तोंड फुटले आहे.  याच पार्श्वभूमीवर हिजाबी खातून हिने केलेल्या वक्तव्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे. 
'जर मराठी भाषा इतकीच महत्त्वाची असेल, तर मुस्लीम समुदायही महाराष्ट्रात राहतो. हिम्मत असेल तर मुस्लीम भागात जाऊन मराठी जबरदस्ती बोलायला सांगा. तुम्ही एकाला हात लावायला गेलात, तर त्यांच्या एकीमुळे शंभर जण समोर येतील,' असे वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. काहींनी हे विधान समाजात तणाव निर्माण करणारे असल्याचेही म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.