Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सोलापूर हादरले! उन्हाचा कडाका जीवघेणा; शेतात फुले तोडताना महिलेचा उष्माघाताने मृत्यू"

​"सोलापूर हादरले! उन्हाचा कडाका जीवघेणा; शेतात फुले तोडताना महिलेचा उष्माघाताने मृत्यू"


सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे (वय ३५) यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून, मोहोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांतील उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डोंगरे कुटुंबीयांनी आपल्या शेतात गुलछडी फुलांची लागवड केली आहे. दररोजप्रमाणे रविवारी सकाळी शोभा डोंगरे या फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. व्यापाऱ्यांना वेळेत फुले देण्यासाठी त्यांनी कडक उन्हात दुपारपर्यंत काम सुरू ठेवले. दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती बाबूराव डोंगरे शेतात आले. उन्हाच्या तीव्रतेमुळे तहान लागल्याने शोभा यांनी पाणी प्यायले, मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बाबूराव डोंगरे यांनी त्यांना तातडीने पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुसज्ज रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे १३ ते १६ मे दरम्यान अकोला जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. काल (मंगळवारी) अकोल्यात ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सोमवारी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. दरम्यान, अकोलेकरांनी दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे करू नयेत आणि उन्हात वाहने शक्यतो चालवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.